ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

मंबई | मनसेनं ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आहे. राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती मनसेनं ताब्यात घेतल्या आहेत. यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढवा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले होते.

इथे हि वाचा 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”


Spread the love