मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वसई-विरारमधील एका कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांकडून गोंधल घालण्यात आला होता. मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी केली.
संबंधित दोन कार्यकर्त्यांना तेथील बंंदोबस्ताला असलेल्या पोलीस निरीक्षण राजेंद्र कांबळे यांनी मारहाण आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहित कांबळे यांचं निलंबन करण्याची मागणी पत्रद्वारे केली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्राच्या गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्यंत घृणास्पद आहे, असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, आंदोलकांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्याची ध्वनिफित सोशल मीडियावर फिरत असल्याचं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.