मुंबई | कोरोना ने सध्या देशाच्या सर्वच भागांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत. गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.रोज तीन ते साडेतीन हजार पटीने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून रोज 5 ते साडे 5 हजाराच्या दरम्यान रुग्ण त्यामुळे एक लाख साठ हजारांच्या जवळपास महाराष्ट्रातील कोरोनाणा बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे, अशातच राज्याच्या दृष्टीने देखील सकारात्मक बातम्या येत आहेत.
महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेने कोरोणाला आटोक्यात आणण्यासाठी पुकारलेल्या युद्धाला यश मिळताना दिसून येत आहे.महाराष्ट्रात रोज नवनवीन जास्तीत जास्त रुग्ण मिळत असले, तरी डिस्चार्ज दिलेल्या पेशंटच्या संख्येत सुद्धा वाढ दिसून येत आहे.
राज्यात काल 4430 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.94 म्हणजेच 53 टक्के एवढे झाले आहे.व अॅक्टिव रुग्णांपेक्षा झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
आज राज्यामध्ये 5 हजार 318 कोरोणा रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे .सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनात रुग्णांची वाढ झाली आहे.शुक्रवारी राज्यात 5024 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले .एकूण कोरोना बाधितांची सख्या आता एक लाख 59 हजार133 वर पोहचली आहे.
इथे हि वाचा
कोरोनील औषधाच्या वादात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल…
शरद पवार-इतिहासात अशी इंधन वाढ कधीही झाली नाही.
पडळकर यांच्या जहाल टीकेवर शरद पवार म्हणाले…