राजेश टोपे यांनी दिली कोरोना औषधांबाबत गुड न्यूज….

0
3

मुंबई | कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंदाची बाब दिली आहे. कोरोनाव्हायरस वर उपलब्ध झालेल्या रेमडेसीवीर, फॅबीपीरावीर आणि टॅझीलोझुमा या औषधांची उपलब्धता जूनअखेरीस केली जाईल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून प स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोणा बाधित रुग्णांवर याआधीही रेमडेसीवीर, फॅबीपीरावीर या औषधांचा वापर उपचारासाठी केला जात होता .परंतु, काही शहर सोडल्यास उर्वरित ठिकाणी असलेल्या शहरांमध्ये या औषधांचा तुटवडा जाणवू लागला. परंतु आता कोरोणा वरील औषध प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर राज्य सरकारने अजून एक निर्णय घेतला आहे की , कंटेंट मेंट मध्ये कोरोणाचे संक्रमण किती नागरिकांना झाले आहे यासाठी अँटीबॉडीज चाचणी करण्यात येतील.

सरकारने आता किलोमीटरचा दर निश्चित करून रुग्णवाहिकेचे पैसे नागरिकांकडून घेतले जातील असा निर्णय केला आहे ,कारण कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकाकडून नागरिकांची लुट झाल्याचा प्रकार लक्षात आला होता.यासाठी खासगी रुग्णवाहिका आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

घ्या जाणून… आजचा पेट्रोल, डिझेलचा दर….

रेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय….?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here