राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्र शी संपर्क साधला त्यात त्यांनी सांगितले की नागरिकांनी घाबरू नका राज्यात रुग्ण दुपटी चा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे, चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असं ते यावेळी म्हणाले.
मुंबईत वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारानटाईन करणार आहे. उद्यापासून मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारान टाई न वाढवण्याचे काम सुरू होणार आहे. कमी जागेमुळे शास्त्रीय पद्धतीने होत नाही. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून व्यवस्था करणार आहे अशी माहिती टोपे यांनी सोशल मीडिया फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून दिली