यूपीएससी चा विद्यार्थी तरूण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी; आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी :- रामदास आठवले

0
8

मुंबई दि.8 – नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील यूपीएससी चा विद्यार्थी तरूण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी; आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी तसेच क्राईम ब्रँच च्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी नागपूर चे ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राकेश ओला यांना केली आहे.

अरविंद बनसोड यांचा संशयास्पद मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप होत असून या हत्येचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध ना रामदास आठवले यांनी केला आहे.आंबेडकरी तरुण अरविंद बनसोड (32 ) यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी आज नागपूर ग्रामीण च्या पोलिस अधीक्षकांना दूरध्वनी करून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपींवर ऍ ट्रॉ सिटी ऍक्ट तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा. त्यांचा अटक पूर्व जमीन रद्द करावा किंवा त्याची मुदत संपताच आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.दिवंगत अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

इथे हि वाचा

वारकरी संस्थे संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भावर दुजाभाव केला :- प्रकाश आंबेडकर

डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करून भारतातच पुतळ्याची निर्मिती करावी

पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here