“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”

मुंबई | औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या नावाबाबत मागणी केली आहे.

औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही आरपीआयची मागणी असं ट्विट करत आठवलेंनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला दिलं असून केंद्रीय उड्डान मंत्री मंत्री हरदिप पुरी यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे.

Share

You may also like...

%d bloggers like this: