मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचा सामना करू शकले नाहीत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
5

मुंबई दि.15 – राज्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत त्यास कारण राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे करोना वाढला आहे. भाजपासोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचा सामना करू शकलेले नाहीत,” अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “२० हजार करोडचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. पण, महाराष्ट्र सरकारनं मात्र राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी पाऊल उचलले नाही. उद्धव ठाकरे हे भाजपशी दोन हात करू इच्छित आहेत. पण करोनाचा सामना करू शकलेले नाहीत. सरकारच्या बेशिस्त पणाने करोना वाढलेला आहे,” असा आरोप ना रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

सध्या कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आशा धोकादायक परिस्थितीत शाळा सुरू करू नयेत. तीन महिन्यानंतर कोरोनाचा धोका टळल्यानंतर शाळा सुरू करण्यास हरकत नाही अन्यथा पुढील वर्गात सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करणे असा निर्णय घेऊन या वर्षी शाळा सुरू करण्याची घाई करू नये तसेच ज्या शाळा सुरू नसताना पालकांना शुल्क भरण्यास दबाव टाकत असतील त्या शाळांवर राज्य सरकार ने कारवाई करावी अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली.

राज्यात अंतिम वर्षाच्या पदवीच्या परीक्षा घेणे आवश्यक आहे मात्र त्या परीक्षा आता न घेता कोरोनाचा धोका टळल्यानंतरच घ्याव्यात. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीव्यक्त केलेल्या भूमिकेचा आदर राखला पाहिजे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात.त्यांना काहीच अधिकार नाहीत अशी कोणी भूमिका घेऊ नये मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात तसेच घटनात्मकदृष्ट्या राज्यपाल ही राज्याचे प्रमुख असतात. असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी रिपाइं चे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे;सुरेश बारशिंग; चांद्रकांता सोनकांबळे; सुरेश निकाळजे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

इथे हि वाचा

नोकरी हवीय.. मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

तर ही गोष्ट तुम्हाला कधीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार नाही

या मंडळाचा निर्णय वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल तर भव्य आगमन सोहळा सुध्दा रद्द..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here