विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काढावा -मा. रामदास आठवले

0
5

दापोली दि.13- निसर्ग चक्रीवादळाने कोकण सर्व उध्वस्त झाले आहे.कोकण हे निसर्ग रम्य आहे. येथील पर्यटन व्यवसाय; शेती; बागायती ; मच्छिमारांच्या बोटी; गावांमधील घरे; समाजमंदिरे उध्वस्त झाली आहेत.मात्र अद्याप वादळग्रस्त कोकण ला शासनाने कोणतीही मदत दिलेली नाही. या नैसर्गिक संकटात कोकण ला शक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित कोकण ला मोठे मदतीचे पॅकेज द्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. केंद्र सरकार कडून कोकणला भरीव मदत देण्यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यात तीन पक्षाचे तिघाडी सरकार असल्याने यांच्यात बिघाडी झाली आहे. ताळमेळ नसल्याने सरकार निर्णय घेण्यास अक्षम्य दिरंगाई करीत आहे. त्यामुळे 10 दिवस झाले तरी कोकण ला शासनाची मदत मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई कारभारावर आम्ही नाराज आहोत . मात्र काँग्रेस पक्ष ही नाराज आहे. काँग्रेस पक्षाच्या 42 आमदारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले मात्र सरकार च्या महत्वाच्या निर्णयात काँग्रेस ला विश्वासात घेतले जात नाही अशी जाहीर नाराजी काँग्रेस च्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस ला जर विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले. कोकणवासी महाविकास आघाडी सरकार वर तीव्र नाराज असल्याचे कोकण दौऱ्यात आपण पाहिले असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

वादळग्रस्त कोकणच्या रायगड मधील माणगाव; रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली या तालुक्यांतील गावांना ना रामदास आठवले यांनी भेट दिल्या.
मंडणगड मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाव असलेल्या आंबडवे या गावाची निसर्ग चक्री वादळाने हानी झाली आहे.त्या गावाला भेट देऊन पाहणी केली. येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलशाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

रायगड मध्ये 6 जनांचा वादळाने मृत्यू झाला आहे.त्यांना केवळ प्रत्येकी 4 लाख सांत्वनपर मदत देण्यात आली ती मदत अल्प असून मृत्यूमुखी पाडलेल्यांचा कुटुंबियांना सांत्वनपर 10 लाख रुपये मदत घ्यावी आशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. नुकसान झालेल्या गावांचे त्वरित पंचनामे करून रोख मदत तहसीलदार मार्फत द्यावेत. घर बांधणीसाठी दीड लाख रुपये देण्यात
येणार असून ती रक्कम अपुरी आहे.त्यात वाढ करून 3 लाख रुपयांची मदत घरांची नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली. मच्छिमारांना मदत द्यावी. दि.3 जून ला वादळ आले मात्र अद्याप कोणतीही मदत वादळग्रस्तांना मदत न मिळणे हे योग्य नसल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

भात शेती सारख्या शेतीच्या नुक्सान भरपाई साठी हेकटरी 50 हजार मदत अल्प असून हेकटरी 1लाख मदत द्यावी. आंबा; सुपारी; आदी फळबागांचे नुकसान भरपाई देताना 10 वर्षांची भरपाई द्यावी तसेच प्रत्येक झाडांचा सर्व्हे करून मदत द्यावि अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
राज्य सरकार ने त्वरित रोख रक्कम वादळग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी या रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्र सरकार कडून वादळग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर याना पत्र लिहिले असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या कोकणात अद्याप वीज सुरू नाही; त्यामुळे पाणी नाही; दळण नाही अशी स्थिती आहे. मान्सून सुरू होत असल्याने त्वरित तुटलेली घरे उभी कारण्यासाठी शासनाने मदत द्यावी. घरावर छप्पर म्हणून पत्र्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
या दौऱ्यात ना रामदास आठवले यांच्या समवेत कुमार जित आठवले; काकासाहेब खंबालकर;अशोक भालेराव; डी एम चव्हाण; दादासाहेब मर्चंडे; के दि कदम सिद्धार्थ कासारे; संजय पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

इथे हि वाचा

विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काढावा -मा. रामदास आठवले

राज्यात लॉकडाऊनच्या काळात ४७३ गुन्हे दाखल; २५६ लोकांना अटक

राज्यसरकार ला इशारा ,तर कोरोनापेक्षा मोठे संकट येईल.:-देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here