रामदेव बाबा-आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका

0
5

देहरादून | कोरोना विषाणूच्या संसर्गावर योगगुरू ग रामदेव बाबा यांनी आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला होता.परंतु त्याच दिवशी संध्याकाळी लगेच केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरात थांबवण्याचा आदेश दिला व जाहिराती वर बंदी घातली.या बंदीनंतर सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्यावर टीका केली गेली. या सर्व प्रकरणावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

पत्रकार परिषदेत रामदेवबाबा म्हणाले, पतंजली ने जे काम केले आहे त्याची स्तुती करावी असा आमचा आग्रह नाही.किंवा मला सत्काराची अपेक्षा सुद्धा नाही. मात्र तिरस्कार तरी करू नका असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर तीन दिवसात 69 टक्के तर सात दिवसात कोरोणा बाधित रुग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आयुष मंत्रालयाला दिली आहे. असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलंय.

कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी त्यांची परवानगी घ्यायला हवी होती त्यांची परवानगी घेण्यात आली होती .त्याबद्दल चे प्रमाणपत्र आयुष मंत्रालयाला आहेच. तसेच पतंजलीच्या प्रयत्नासाठी आयुष मंत्रालयाने कौतुक केले, असं देखील रामदेव बाबांनी यावेळी सांगितलं.

इथे हि वाचा

उद्धव ठाकरे-लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान!

अमेरिका कोरोणा लसीचा शोधात आघाडीवर…

वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here