RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

Spread the love

कोल्हापूर | शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केल्याचं कळतंय.

परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलंय. रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते.

शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.

पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांची रक्कम इश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँक बंद झाली असली तरी लिक्विडेशननंतर बँकेत पैसे जमा असलेल्या खातेदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे. ज्यांनी बँकेत 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, त्यांचा याचा लाभ मिळणार आहे.


Spread the love