बुलडाणा | शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रायणी गोमासे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तहसीलदार पद पटकावले आहे.
इंद्रायणी गोमासे यांनी लग्न झाल्यावरही शिक्षण पूर्ण केले व आपले यश प्राप्त केले. शिकून काय करायचं आहे , घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण बनला आहे .
इंद्रायणी यांचे पती सध्या छत्तीसगड येथील बस्तर मध्ये देशाची सेवा करत आहेत इंद्रायणी यांचा लग्नानंतर त्यांचे पती सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते. बाकी परिवार तील लोक शेतकरी असूनही, इंद्रायणी यांच्या सासरच्यांनी कधीही शिक्षणाला विरोध केला नाही व शिक्षण सुरूच ठेवलं.
इंद्रायणी यांनी राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्या स्पर्धा परीक्षे साठी खाजगी शिकवण्यायातून तसेच स्वतः अभ्यास करून राज्य आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तसेच त्यांनी मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला ओबीसी प्रवर्गातून त्या तहसीलदार झाले आहेत.
इथे हि वाचा
पिंपरी चिंचवड- येथील पी एस आय ला पैशांची लाच घेताना अटक…
राहुल गांधी म्हणाले,नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत
चिंताजनक बातमी… पुणे जिल्ह्यात एकच दिवसात कोरोना बाधितांची संख्या 823