सांगली | नोटेवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते सांगलीत बोलत होते.
या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत असल्याचंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे
बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपुर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी असंही संंभाजी भिडेंनी सांगितलं.
दरम्यान, या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांना जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसं या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना पाहिजेच असल्याचंही भिडे म्हणाले.