सॅमसंगचा नवा स्मार्टफोन होणार लॉन्च….

दक्षिण कोरिया  | जगभरात लोकप्रिय असलेला सॅमसंग कंपनी चा नवीन स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येणार आहे. सॅमसंग स्मार्टफोन नोट20 सिरीज ऑगस्ट महिन्यात लॉन्च केली जाईल .अशी शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच या फोनमधील विशेष म्हणजे स्मार्टफोन मध्ये तब्बल 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

‘गॅलेक्सी नोट अल्ट्रा’ हा या सिरीजमधला पहिला स्मार्टफोन असेल. LTPO OLED डिस्प्ले तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर या स्मार्टफोनची खासियत असणार आहे.

शक्यतो ग्राहक मोबाईल घेताना फोनचा कॅमेरा ची क्वालिटी तपासात असतात. हीच ग्राहकांची विशेष आवड लक्षात घेता कंपनीने या सीरिजमध्ये टेलीफोटो आणि अल्ट्रा वाइड चा समावेश केला आहे .तसेच तसेच कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहेकी ,कॅमेरा लेन्स सोडून बाकीचे फिचर्स हे नोट २० प्लस सारखेच असल्याची माहिती दिली.

त्याचबरोबर तज्ञांचे म्हणणे आहे की, सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोन सोबत अनेक प्रकारचे मॉडेल सुध्दा कंपनी लॉन्च करणार आहे. त्यामुळे मोबाईल घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांना साठी हा चांगला पर्याय असू शकेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: