संजय लीला भन्साळी यांची सुशांतच्या आत्महत्येबद्दल पोलिसांकडून होणार चौकशी…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत ते प्रकरणाबद्दल पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणासंबंधी अनेकांकडून जवाब घेण्यात आलेला आहे. तसेच त्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यशराज फिल्म कास्टिंग डायरेक्टर शानु शर्मा यांची 28 जून रोजी वांद्रे च्या पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती. परंतु पुन्हा कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे .

सुशांतने शानू शर्मा यांच्या सोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या दोन चित्रपटांसाठी काम केले होते . सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि शेखर कपूर यांचे सुद्धा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. व याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर संबंधित विषय मुद्द्यांवर भाष्य सुद्धा केले. व त्यामुळे त्यांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

सूशांतने 14 जून रोजी आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले . परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही .या संबंधित पोलिसांनी 27 जणांचे जवाब नोंदवले आहेत व सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला व त्यावर वाद सुद्धा सुरू आहेत.

इथे हि वाचा

सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

मुंबईकरांनो…सलूनमध्ये चाललाय?, तर आधी ‘ही’ नियमावली जरूर वाचा…

राजेश टोपे -आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: