संजय राऊत- चिनी ॲप बंदि साठी 20 जवानांचा बलिदानाची वाट पाहत होतात का?

0
3

मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली चिनी अ‍ॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी पासून माहिती होते, तर या कंपन्या का सुरु होत्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. या ॲपच्या बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?, अशी टीका सरकार वर केली.

चीनचं आर्थिक कंबरडं मोडलाच पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूकीबाबतही आर्थिक धोरण सुध्दा ठरवलं पाहिजे. नहितर, पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

चिनी अ‍ॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला.

भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद राजकीय धोरणात्मक असल्याचं ते बोलले. व याच्यात राजकारण होऊ देऊ नये. तसेच सीमेवर आपले जवान समर्थ आहेत .असेही संजय राऊत म्हणाले.

इथे हि वाचा

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here