महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली असताना गेल्या दोन महिन्यांपासून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षात बाहेर जाऊन परिस्थितीची पाहणी का करत नाहीत, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला जातोय? विरोधकांच्या याच टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे, म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडतायेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री या सगळ्या ठिकाणाहून ते काम करत आहेत पण हे मात्र विरोधी पक्षाला दिसणार नाही, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.
नरेंद्र मोदी हे सुद्धा घराबाहेर न पडता काम करत आहेत. गृहमंत्री अमित शहा देखील गेल्या कित्येक दिवसांपासून दिसले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष का विचारत नाही, असंही राऊत म्हणाले.
शिक्षण, उद्योग, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील अपडेट्स आणि नवीन योजनांच्या बाबतीत मुख्यमंत्री तज्ज्ञांसोबत चर्चा करतात. सरकारी कामकाजाबाबतही महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू असते. विरोधी पक्षाने त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलून घ्यावा आणि महाारष्ट्र सरकार करत असलेलं काम उघड्या डोळ्यांनी बघावं, असं राऊत म्हणाले.
इथे हि वाचा
देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९
देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी
पृथ्वीराज चव्हाण-म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार
Comments 1