सध्या मोठ्या प्रमाणात भारत-चीन यांच्यातील सीमावाद ताणला गेल्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले.या बदल माहिती anni या वृत्त पत्राने दिली. या घटनेनंतर देशभरात चीनविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे. सीमेवर काय घडलं याबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना संजय राऊत यांनी भूमिका मांडली. “सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही,” असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
सीमेवर झालेल्या संघर्षाविषयी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, “सीमेवर जे काही घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी वा राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही. २० जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. पंतप्रधान जो काही निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील. पण, चुकीचं काय झालं हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवं,” असं भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
इथे हि वाचा
काही क्षणासाठी मा.एड. बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादेत….
राजू शेट्टी यांची आमदारकी नक्की, शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब