नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात कोरोणा ने कहर केलेला आहे .गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना बाधितांची सर्वाधिक नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे.साधारण वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण दररोज आठलून येत होते. परंतु 20 हजारांची सरासरी सुद्धा कोरोणात बाधितांच्या रुग्णांनी गेल्या 24 तासात ओलांडली आहे .त्यामुळे संपूर्ण भारतभरात भयावह वातावरण झाले आहे.
गेल्या 24 तासांत देशात 22 हजार 771 नव्या कोरोना बाधित रुग्ण आठलुन आले आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 6 लाख 48 हजार 315 इतकी झाली आहे.त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांमध्ये 442 लोकांचा मृत्यू कोरोणा मुळे झालेला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.
त्याचबरोबर भारताचा रेकव्हरी रेट सुधारून 60 टक्के पर्यंत पोहोचला आहे.देशात सध्या 2 लाख 35 हजार 433 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 94 हजार 227 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण ॲक्टिव केसेस म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे .
महाराष्ट्रात सध्या 79 हजार 911 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच शुक्रवारी कोरोनाचे 6 हजार 364 नवीन रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात सर्व राज्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
इथे ही वाचा
राजेश टोपे यांनी केले भारतात तयार होणाऱ्या लसी बद्दल वक्तव्य.
सी,ए, परीक्षा रद्द – प्रसाद सोनवणे यांच्या मागणीला यश
हवामान खात्याने दिला इशारा.. येत्या 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस….