नवी दिल्ली | देशात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .चौथ्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने आर्थिकगाडी रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन् च्या काही अटी थीशील केलेल्या होत्या. परंतु त्यानंतर कोरोणा ग्रस्तांची संख्या भलतीकडेच वाढत चाललेली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये28 हजार 701 कोरोना च्या केसेस आठलुन आलेल्या आहेत .
आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना बाधितांची एका दिवसातली नोंद करण्यात आलेली आहे.
आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे की, कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 8 लाख 78 हजार 254 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 500 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात सध्या 3 लाख 01 हजार 609 अॅक्टिवे रूग्ण आहेत. तर 5 लाख 53 हजार 471 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्याचबरोबर भारताचा रीकव्हरी रेट सुधारून आता तो 62 टक्क्यांवर पोहोचलेला आहे ही दिलासादायक बातमी भारतासाठी आहे.
त्याचबरोबर संपूर्ण राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक कोणाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. राज्यात रविवारी 7 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 3 हजार516 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, याबद्दलची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
इथे ही वाचा
भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, सचिन पायलट यांनी बदलली भूमिका..
हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात… ‘जंगजौहर’चा रक्त सळसळ करायला लावणारा टीझर
ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…