राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोशल मीडिया फेसबुक लाईफ च्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेशी संवाद साधत आहे.
या आधी शरद पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्राला कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संबोधित केले आहे आज परत संबोधित करत आहेत यावेळी ते म्हणाले की पुढचे बारा दिवस आपण जर काळजी घेतली तर डाऊन मध्ये वाढ करावी लागणार नाही.
भारताच्या लोक संख्येच्या दृष्टीने भारताची अवस्था बरी आहे . आरोग्य आणि साधांनानी सप्नन असलेला अमेरिका देशाची अवस्था अतिशय वाईट आहे. अमेरिका मध्ये कोरोना मुळे ४० हजार पेक्षा जास्त मुत्यू आहेत त्यापेक्षा भारताची अवस्था बरी आहे असं ते म्हणाले.
तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये अतिशय गंभीर अवस्था आहे त्यातून आपण धडा घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये. आणि केंद्राच्या नियमावली चे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले
तसेच पुणे ,मुंबई ,ठाणे येथे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये असे त्यांनी पुनरुच्चार केले आणि पाशिमात्य देशांशी महाराष्ट्राची बरोबरी करणे हे सुद्धा योग्य नाही असे त्यांनी पवारांनी फेसबूक लाईव्ह द्वारें सांगितले.