नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमधील रचनात्मक संवाद सुरु होईल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही कायद्यांना सथगिती देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला संधी मिळाली आहे. सर्वांशी चर्चा करावी आणि शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, कायद्यांचा पुनर्विचार करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या