धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेवर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने गंभीर आरोप केले आहेत. मुंडे या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया दिली आहे.

धनंजय मुंडेंनी मला सांगितल्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल याची कल्पना मुंडे त्यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेत आदेश प्राप्त करुन घेतला असल्याचं पवार म्हणाले.

पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, कुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. मुंडे यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक माझ्यापुढे मांडली आहे. मात्र अशा प्रकरणात निर्णय सर्वानुमते घ्यावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, हे प्रकरण इथपर्यंत येईल, व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात यापूर्वीच आपली भूमिका मांडली असल्याचं पवार म्हणाले.

Share

You may also like...

%d bloggers like this: