सातारा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींवर आपले मत व्यक्त केले आहे,पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तसेच भारत-चीन यांच्यातील वादावर त्याचबरोबरीनं इंधन वाढीवर सुद्धा आपले मत व्यक्त केले ,मी इतिहासात कधीही अशी इंधन वाढ पाहिली नाही असं पवार म्हणाले.
इतिहासात असे कधीही पाहिले गेले नाही की इंधन दरवाढ रोज होत आहे.आधीच सर्वसामान्य लोक हे कोरोणाच्या संकटात असताना परिस्थिती अजून अनपेक्षित होत आहे. या इंधनाच्या दरवाढीमुळे इकॉनोमी वर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले , लॉक डाऊन असल्यामुळे लोक काही बोलत नाहीत .याचा फायदा घेतला जात आहे असे पवारांनी भाष्य करत सरकारवर आरोप केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी पदाधिकाऱ्यांवर सुद्धा निशाणा साधला ते पडळकर यांना म्हणाले, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्यांची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही.
त्याचबरोबर ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षा ह्या मुद्दा मध्ये राजकारण आणू नये. यापूर्वी भारतीय भूमी वर चीनने ताबा घेतला आहे .आज घेतला की नाही हे आम्हाला माहिती नाही. म्हणून राष्ट्रीय सुरक्षे त राजकारण आणू नये,असे आवाहन सुद्धा त्यांनी दिले आहे.
इथे ही वाचा
नितीन गडकरी-मुंबई पुण्यामधील गर्दी कमी करणे आवश्यक….
शाळेतल्या वर्ग खोल्यांमध्ये धक्कादायक प्रकार….
रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत