धक्कादायक! आईला कोरोना झाल्याचं कळताच 23 वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक | 23 वर्षीय मुलाने आपल्या आईला कोरोणा संसर्गाची लागण झाल्याचे समजल्यानंतर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा दुर्दैवी प्रकार घडला.समाज कल्याण कार्यालयातील कोविड सेंटर मध्ये संबंधित महिलेवर मागील काही दिवसांमध्ये उपचार सुरू होतेच याबद्दलचा तपास उपनगर पोलिस करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संबंधित महिलेवर कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरू होते.23 वर्षीय मुलाने आपल्या आईला कोरोणा ची लागण झाल्याचे समजल्यावर नैराश्यात येउन गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले व उपनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

या मुलाने आईला कोरोन झाल्याचे समजल्यानंतर आत्महत्या केली तर परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. या आत्महत्येनंतर या भागात शोककळा पसरली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरु आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 588 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत तसेच नाशिक शहरामध्ये 407 आणि ग्रामीण भागामध्ये 181 रुग्ण आढळले आहेत .तसेच एकूण सहा जणांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

इथे ही वाचा

देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे चार नेते दिल्लीत; अमित शहांची घेतली भेट

वीस वर्षीय तरुणीने कोल्हापुरात घेतला गळफास…

माझा देव आणला!; ‘त्या’ भेटवस्तूने खासदार उदयनराजे भारावले

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: