नागपूर | कोरोणा चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता राज्यभरातील शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता .तर शिक्षकांनी वर्गखोल्या स्वच्छ करण्यासाठी उघडल्या तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
पारशिवनी तालुक्यातील सिहोरा तालुक्यातील गाव च्या जिल्हा परिषद शिकवण देणाऱ्या शाळेमध्ये चक्क देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या असा धक्कादायक प्रकार बघायला मिळाला यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
शाळेची संपूर्ण जबाबदारी मुख्य पोषण आहार सेविका शशिकला मेश्राम यांच्याकडे देण्यात आली होती.व शाळेतील खोल्यांचा सर्व चाव्या या सुद्धा त्यांच्याकडे होत्या .वर्गखोल्या स्वच्छ करत असताना चौथ्या वर्गाची खोली मात्र काहीही केल्यानंतर सुद्धा उघडत नव्हती.बऱ्याच प्रयत्नानंतर तीनच्या सुमारास खोली उघडली.
खोली उघडल्या उघडल्या दारूचा वास घमघामायला लागला वर्गात चक्क दारूच्या 5 पेट्या आणि 9 बियरच्या बाटल्या वर्गात होत्या. यासंदर्भात शाळेतील मुख्याध्यापकांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
इथे हि वाचा
भारतात कोरोना ने तोडला रेकॉर्ड, गेल्या 24 तासात धक्कादायक आकडेवारी…..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!
16 वर्षीय टिक टॉक स्टार ने केली आत्महत्या….