कानपूर | विकास दुबे वर 8 पोलिसांची हत्या केल्याचा आरोप होता या प्रकरणात पोलिसांच्या चकमकीत विकास ला एन्काऊंटर करण्यात आले
त्या एन्काऊंटर च्या आधी एका नाक्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी मीडियाच्या गाड्या अडवल्या असल्याचा व्हिडीओ समोर आलेला आहे.
मीडिया च्या गाड्या का घडवल्या जात आहेत असं रिपोर्टरने पोलिसांना विचारल्यानंतर दररोज प्रमाणे चेकिंग सुरू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु त्याचा अर्धा तासानंतर विकास दुबेच्या एन्काऊंटर चे वृत्त समोर आले.
उज्जैन महाकाल च्या मंदिरात विकास दुबे ला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. नंतर पुढील चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्याचा अपघात झाला.
या अपघातात दरम्यानच पोलिसाचे पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला व तसेच त्यांनी पोलिसांवर फायरिंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी स्वतःच्या स्वरक्षण साठी त्याच्यावर हल्ला केला नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जाण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.
इथे ही वाचा
विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!
कोरोणा वरील सर्वात स्वस्त जेनेरिक औषध बनवण्यात भारताच्या या कंपनीला यश…
विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…