नवी दिल्ली | नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोणा उपचारासाठी पतंजलीचे औषध शोधून काढल्याची माहिती दिली होती. परंतु एका वृत्तवाहिनीने एक नवा खुलासा केला आहे की हे औषध कोरोणा वरील उपचारासाठी नाही .
हे औषध कोरोणा वरील उपचारासाठी नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व सर्दी तापासाठी असल्याची माहिती ,रामदेव बाबा यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे पतंजली ने बनवलेल्या औषधाच्या मान्यतेसाठी अर्ज केलेला होता परंतु या अर्जामध्ये हे औषध कोरोणासाठी आहे असा उल्लेख कुठेही केलेला नव्हता .अशी माहिती समोर आलेली आहे .
त्यामुळे आयुष मंत्रालयाने या औषधाला अद्याप मान्यता दिलेली नाही ,कारण रामदेव बाबांच्या या औषधावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत व तसेच या औषधांची जाहिरात थांबवण्याचे आदेश आयुष मंत्रालया यांने रामदेव बाबा यांना दिले आहेत.
त्याचबरोबर रामदेव बाबा यांनी तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होईल असा दावा सुद्धा केला आहे .हे औषध कोरोना उपचारासाठी अत्यंत गुणकारी आहे असे सुद्धा रामदेव बाबा यांनी सांगितले.
इथे हि वाचा
सुप्रिया सुळे यांची एमपीएससी परीक्षेबाबत मागणी…..
सुशांत सिंह च्या मृत्यूबद्दल सीबीआयचौकशी ची केली मागणी – शेखर सुमन.
रोहित पवार- तातडीने मराठी तरुणां नी कंपन्या मध्ये जॉईन होण्याचा विचार करावा.