अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांची चौकशी सुरु

शिमला | सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या प्रकरणानंतर घराणेशाही व गटबाजीला कंगना राणावत कडून विरोध करण्यास तीव्र विरोध करण्यात आलेला असल्यामुळे ती फारच चर्चेत आलेली होती. पण आता दुसरीकडे कंगना राणावतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं समजलं आहे त्यावर आपल्याला घाबरवण्याचा येत असल्याचा दावा कंगना राणावत कडून करण्यात आलेला आहेत.

कंगना सध्या तिच्या कुल्लू मधील घरी राहात आहे व कंगनाच्या सांगण्या नुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळीबार चा आवाज ऐकू आला. व तिला आधी फटाके असावेत असं वाटलं परंतु नंतर कंगनाने तिच्या सुरक्षा रक्षकाला बोलल्यानंतर त्याला कदाचित गोळीबाराचा आवाज नवीन म्हणून तो ओळखू शकलेला नाही.

या घटनेच्या दरम्यान कंगना सोबत घरातील चार सदस्यही तेथे उपस्थित होते व या बद्दल ची संपूर्ण माहिती कंगनाने पोलिसांना दिलेली आहे. व पोलिसांच्या म्हणण्यानु सार स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे वटवाघूळला मारण्याचा प्रयत्न केलेला असावा.परंतु शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे की कोणत्या प्रकारची गोळीबार करण्यात आली नाही.

कंगनाच्या घराच्या आसपास गोळीबार झाल्याचे कोणत्याही प्रकारचे पुरावे पोलिसांना सापडलेले नाही .सध्या तिच्या घराशेजारी राहणाऱ्या यांची चौकशी केली जात असून कंगनाच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

इथे ही वाचा

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: