नवी दिल्ली | कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे.तसेच सेवा क्षेत्रात सुद्धा अनेक उद्योग संकटात आलेले आहेत.यावरुनच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे.
मी आर्थिक स्तूनमी येणार असं काही दिवसांपूर्वी बोललो होतो. मी परिस्थितीची आधीच कल्पना दिली म्हणून भाजप प्रसारमाध्यमांनी माझी थट्टा केलेली आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अर्थव्यवस्थेचे नुकसान झालेले आहे.राहुल गांधी यांनी एक ट्विट करत सांगितले की, लघु आणि मध्यम उद्योग नष्ट झालेले आहेत. मोठ-मोठ्या कंपन्या सुद्धा प्रचंड तणावाखाली आहेत. तसेच बँकासुद्धा संकटात आहेत असं राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलेले आहे.
1.68 लाख कोटींचा कठीण परिस्थिती आली तर कर्जाच्या अतिरिक्त बोजा वाढू शकण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. याच माहितीचा हवाला देत राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरत टीका केली आहे.
इथे ही वाचा
धक्कादायक -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !
गंभीर जखमी मुलीला वंचितचे कायदेशीर व आर्थिक मदतीचे आश्वासन
मुलुंड येथे १,७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र सिडकोच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे