सोनू निगमचे बड्या आसामीला धमकी…. माझ्या नादी लागू नका…

0
4

मुंबई | बॉलीवूड मधला प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी टी.सिरीज चे सर्वेसर्वा भूषण कुमार यांना धमकी दिली की, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर तुझा काळा धंदा बाहेर काढीन” . त्याचबरोबर सध्या बॉलिवूडमध्ये सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सर्व गट वाद समोर येत आहेत त्यातच सोनू निगम यांनी संगीतक्षेत्रातील काळी बाजू उघडी पाडण्याची धमकी दिली.

त्याच बरोबर सोनू निगम यांनी, भाई माझ्या तोंडी लागू नकोस. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेत आहेस, तुला आठवत असेल तू माझ्या घरी यायचास.. स्मिता ठाकरेशी माझी गाठ घालून दे, बाळासाहेब ठाकरेंना मला भेटायचं आहे. असा म्हणायचास. मला आबू सालेम धमक्या देतोय, मला वाचव. अशी विनवणी करायचास. असे सांगत त्यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट केली व ही सर्व माहिती शेअर केली आहे.

सोनू निगम ने नुकताच भारतातील बड्या संगीत कंपन्यांवर काही आरोप केले होते. यामध्ये भूषण कुमार यांच्या t series चा सुद्धा समावेश होता ,तर सोनू निगम यांनी माझ्या नादी लागलास तर मरिना कंवरचा व्हिडीयो मी युट्यूबवर अपलोड करेन’ असा धमकीचा इशारा भुषण कुमार यांना दिला आहे.

सोनू निगम यांनी व्हिडिओ मध्ये सांगितले की नुकताच एका कलाकार सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली आहे .उद्या एखादा गीतकार संगीतकार सुद्धा आत्महत्या करू शकतो कारण बॉलीवूड चित्रपटांपेक्षा अधिक माफिया संगीत मध्ये आहे. कोणत्या गीतकाराला बॉलिवूड क्षेत्रामध्ये घ्यायचं की नाही हे सध्या दोनच व्यक्ती ठरवत आहेत यावर मी मात करून पुढे आलो आहे पण नवीन संगीतकारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

इथे हि वाचा

देवेंद्र फडवणीस-वाईट तर याचं वाटलं की एवढ्या जागा जिंकूनही मुख्यमंत्री झालो नाही.

चांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here