मुंबई | गेल्या 21 दिवसांपासून इंधनाच्या वाढीमध्ये रोज वाढ होत आहे. यावरूनच मोदी सरकारला घे रण्याच्या हालचाली काँग्रेस करत आहे. या पार्श्वभूमीवर 29 जून सोमवार रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेत दोन तास इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवरून आंदोलन करण्यात येणार आहे.काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर दररोजचा भाववाढीमुळे आज पेट्रोलला 87-88 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल या भाव वाढीत प्रति लिटर 9.12 रुपये तर डिझेल 11.01 रुपयांनी वाढ झाली आहे.त्याचबरोबर थोरात म्हणाले की काही दिवसांनी पेट्रोल साठी शंभर रुपये मोजावे लागतील.
त्याचबरोबर इंधन दरवाढ जनतेवर अन्याय करणारी आहे.कच्च्या तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातकच्च्या तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड कमी असताना सुद्धा मोदी सरकार याचा जनतेला लाभ देत नाही. आधीच लोकांचे रोजगार कोरोणामुळे गेले आहेत. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याच रोज इंधनाची दरात वाढ होत आहे असं बाळासाहेब म्हणाले.
इंधन दरवाढ तात्काळ मागे करावी व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग चे नियम पाहून तसेच मास्क लावून आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच याचदिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवली जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलंय
इथे ही वाचा
उद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का…?
शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचे उत्तर- खर राजकारण तर….
आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल