खाजगी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी तीन महिन्याकरिता माफ करावी विद्यार्थी संघटनेची मागणी.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मार्चपासून टाळेबंदी होती . या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या . त्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं आहे . अनलॉकमध्ये काही खाजगी कंपनी या काही अटीवर सुरू आहेत . तसेच अनेक कंपन्या या अद्याप पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत . त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

त्यामुळे अनेक नोकरदार वर्ग गावी जात आहे , गेला आहे . तसेच या काळात खाजगी शाळा व महाविद्यालये पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत . त्यामुळे विद्यार्थी – पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .

सध्या आर्थिक समस्येला अनेकांना सामोरे जावे लागत आहे . या सर्व परिस्थितीचा विचार करता खाजगी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी तीन महिन्याकरिता माफ करावी . राज्याच्या शिक्षणमंत्री यांच्या सोबत ईमेल आणि ट्विटर च्या माध्यमातून पत्र व्यवहार करून रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेने ही मागणी केली.

इथे हि वाचा

काही क्षणासाठी मा.एड. बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादेत….

राजू शेट्टी यांची आमदारकी नक्की, शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प सहा जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्व्हेचा निष्कर्ष

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: