पाटणा | बिहारमधील पाटणा शहरातील पोलीस विभागातील सेवानिवृत्त डी.एस. पी के. चंद्रा हे एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी होते. यांच्या नावावर 64 एन्काऊंटर केल्याची नोंद होती. व त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर पूर्ण परिसरात खळबळ उडाली .व आत्महत्या केलेल्या ठिकाणी तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती सुसाइड नोट सापडली आहे व त्या सुसाईड नोट मध्ये आत्महत्या करण्यामागील कारण याचा खुलासा असल्याचा दावा.
के चंद्रा यांच्याकडून पत्रात लिहिण्यात आले आहे की ,मला माफ करा मी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा कारण मी कित्येक महिन्यांपासून मानसिक तणावात आहे व मला झोपच येत नाही. परंतु आता असह्य झालं आहे .म्हणून मी हा निर्णय घेतला. परंतु माझा मोबाईल मात्र चालू ठेवा कारण घरातल्या सर्व कामांसाठी हाच मोबाईल नंबर आहे .
त्याचबरोबर तब्बल सोळा वर्ष मी या तणावात जगत आलो होतो. यासाठी मी अनेक औषध उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु. मला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही.त्याच बरोबर कॉलनी मधील संतोष सिन्हा यांच्या त्रासामुळे मी तणावात होतो व त्यांच्या छळाला कंटाळूनच मी आज आत्महत्या करत आहे.असे सुसाईड नोटमध्ये सापडण्यात आले आहे.
इथे हि वाचा
मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू…500 ते 1000 रुपये पर्यंत दंड…
रामदेव बाबांच्या औषधांबाबत मंत्रालयाचे आदेश….रामदेव बाबा यांना धक्का…
गोपीचंद पडळकर….शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे लागलेला कोरोना आहे