कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन

अकोला ,दि.२८ – वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.

वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सुरेश नंदिरे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
9867600300

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: