नवी दिल्ली| सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाबद्दल सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे मराठा आरक्षणाचा प्रकरण जाणार की नाही ,तसेच वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षांमधील मराठा आरक्षण या महत्त्वाच्या प्रश्नांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगीती द्यायला नकार सर्वोच्च न्यायालयाकडून मागील सुनावणी मध्ये देण्यात आला होता.त्याचबरोबर हा अंतरिम निर्णय असून अंतिम निर्णय निकालानंतर याबाबत सर्व आदेशा स्पष्ट करण्यात येतील असे सांगण्यात आले होते तसेच यावर आज सुनावणी पार पडणार आहे.
मराठा आरक्षण चळवळीचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण चळवळीचे कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबतची सुनावणीही आज सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे ,असे सांगण्यात आलेले आहे.
इथे ही वाचा
कोरोनावर मात करण्यासाठी अजित पवारांनी उचललं धाडसी पाऊल…
कोरोनावर मात करण्यासाठी अजित पवारांनी उचललं धाडसी पाऊल…
जयंत पाटील- माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान…