सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार

जयपूर | सध्या बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा विषय फारच चर्चेला आलेला आहे. तसेच सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टींचे उधाण आले आहे. त्याचबरोबर सुशांत ला न्याय मिळवून देण्यासाठी करणी सेनेने पुढाकार घेतल्याची माहिती मिळत आहे.सुशांत सिंग राजपूत चे आत्महत्येसाठी काही बडे कलाकार हे जबाबदार आहेत असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.

आता करणी सेनेने सुशांत सिंग राजपूत ला न्याय मिळवून देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये करनी सेने बाबत बरीच दहशत आहे. कारण करणी सेनेने याआधी अनेक सिनेमांना विरोध केला आहे .सिनेमांवर आंदोलन केले आहेत व तसेच आता सुशांतच्या आत्महत्येच्या लढण्याची घोषणा केली आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्याची माहिती करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंग मकराना यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितलं. तसेच आम्ही सुशांतच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत तसंच सुशांत आम्हाला भावाप्रमाणे होता. त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले आहे. अशा प्रकारचा अन्याय कधीही सहन केला जाऊ शकणार नाही. याबाबतची पाऊल पुढे ठरवण्यात येणार असल्याचंही महिपाल यांनी सांगितलं.

सुशांतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली या घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला आहे व अजूनही सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का आहे. या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील नेपोटीझमचा मुद्दा पुढे आला आहे.

इथे हि वाचा

तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये…. संदीप जोशी

एटीएम मधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये जुलैपासून बदल….

कोरोनावर मात केल्यानंतर आव्हाड पुन्हा मैदानात, पिंपरी चिंचवडच्या झोपपट्टीसंदर्भात केली मोठी घोषणा

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: