मुंबई | बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपुतने गळफास लावून आत्महत्या केली. आपले जीवन संपवून टाकले. मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सेलिना जेटली हिने त्यांच्या अभिनयाची प्रचंड स्तुति केली व त्याच्या नैराश्य वर भाष्य केले.
सेलिना म्हणाली,नैराश्य ही अत्यंत वाईट स्थिती असते. व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब तो तणावमुळे त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अनेकदा त्याच्याकडून चूकीचे निर्णय घेतले जातात. हा अनुभव मी देखील घेतला आहे, असं सेलिनाने सांगितलंय.
सुशांतने आत्महत्या करण्याच टोकाचं पाऊल उचललं,कदाचित त्याची तणावामुळे अशीच अवस्था झाली असेल. नाही तर ,इतका हरहुन्नरी असलेला, अभिनयात तरबेज असलेला ,असा यशस्वी अभिनेता आत्महत्येचा विचार का करेल? त्याने एक दिवस सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव नक्की कोरले असते असं मला त्याच्या अभिनयाकडे बघून वाट पाहून वाटते ,असं सेलिना म्हणाली.
अद्याप सुशांत च्या आत्महत्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु देखील सुशांत ने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे.
इथे हि वाचा
मायावती-कोरोणा च्या संकटात सामान्य माणसाला इंधन वाढीचे शोक नको.
बाळासाहेब थोरात-आमचं सरकार पाच वर्षे टिकणारं च विरोधकांना संदेश.
“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”