मुंबई | पाकिस्तानातील कराची मधून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये धमकी भरा फोन आल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. कोणत्यातरी अज्ञातांनी रात्री उशिरा हॉटेल मधल्या फोनवर फोन करून मुंबईतील ताज हॉटेल अशी धमकी दिली अशी माहिती समोर आली आहे.
सध्या हॉटेलच्या सुरक्षेसाठी वाढ केली गेलेली आहे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी धमकीचा फोन आल्यानंतर तातडीने मुंबई पोलिसांना याबाबतची सर्व माहिती दिली व मुंबई पोलिसांनी त्या ताज हॉटेलच्या सुरक्षितेसाठी तयारी केली. दरम्यान, हा फोन कराचीतून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्या अज्ञात व्यक्तीने आपलं नाव सुलतान असल्याचं फोनवर सांगितले. तसेच 26/11 सारखा पुन्हा हल्ला ताज हॉटेलमध्ये करू असे सांगितले तसेच हा फोन पाकिस्तानातून केला गेलेला आहे असं सांगत त्यांनी धमकी दिली.
कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला अतिरेकी हल्ला सगळ्यांनी बघितलाय आहे. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार, असंदेखील तो फोनवर म्हणाल्याची माहिती आहे.
इथे हि वाचा
टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…
संजय राऊत- चिनी ॲप बंदि साठी 20 जवानांचा बलिदानाची वाट पाहत होतात का?
लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा