जळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार त्या कोरोनाबाधित गायब 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये सापडला

0
4

जळगाव:-कोरोनाच्या या काळात आपण असे अनेक घटना बघितल्या आहेत. तर कालच 70 वर्षीय शताब्दी(कांदिवली) रुग्णालयातील आजोबांचा मृत्यू बोरीवली स्टेशन येते सापडला होता. अश्याच तर पुन्हा एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
मागील हप्त्यात मालती नेहते 82 वर्षीय आजी ह्या रुग्णालयातुन गायब झाल्याची माहिती आलो होती.

भुसावळच्या मालती नेहते या 82 वर्षीय आजींची 1 जून रोजी प्रकृती बिघडली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली.
त्या नंतर सर्व यंत्रणा कार्याला होती.या संदर्भात हर्षल नेहते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती.

अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी हर्षल नेहते यांना त्यांच्या आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडल्याची माहिती दिली. या संबोधित त्यांनी एक व्हिडिओ वर सर्व माहिती दिली आहे. तो व्हिडिओ किरीट सोमया यांनी आपल्या ट्विटर वर शेअर केला आहे. दोषींवर कारवाई करा असे उध्दव ठाकरे यांना म्हटले आहे.

इथे हि वाचा
उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

शरद पवार-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार नाही

अखेर त्या नगरसेवकाची झुंज सुध्दा अपयशी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here