महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना सवर्ण मुलीवर प्रेम करतो म्हणून बौध्द मुलाची हत्या

Spread the love

पुणे:- महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षे अश्या घटना पाहायला मिळत आहेत. दलित,बौध्द,मागासवर्गीय यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत.आताच मागील महिन्यात उच्चशिक्षित अरविंद बनसोड हे प्रकरण आपल्याला माहिती असेच. आता अश्यात पुन्हा महाराष्ट्राला काळिमा फासलणारी घटना घडली आहे.विराज(वय२०)या बौध्द मुलाचे सवर्ण मुलीशी प्रेम होते. जगदीश काटे यांच्या मुलीशी विराज जगताप या मुलाचे प्रेम करत होते. जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करतो या कारणावरून चिडून जाऊन छोट्या टेम्पोनेविराज जगताप यांच्या दुचाकीला धडक देऊन पडल्यानंतर पळून जात असतांना


जगदीश काटे व त्यांच्या 4 सहकारी टेम्पो मधील हातामध्ये लोखंडी सळी, दगड घेऊन उतरून हेमंत काटे यांनी लोखंडी सळी घेऊन विराज यांच्या डोक्यात मारली व बाकी आरोपी यांनी विराज क हातपाय बांधून ठेवले होते..
त्या वेळेस जगदीश काटे विराज याला म्हणाला ” तु महार मांगाचा आहेस, तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करण्याची तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो का ” असे जातीवाचक बोलून विराजच्या अंगावर थुंकला. त्याला मारा लागलेला होता जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला.या सर्व घटनेची तक्रार पिंपरी चिंचवड येथील सांगावी पोलीस ठाण्यात जितेश जगताप यांनी केली.तक्रारीत सर्व नमुद केले आहे.

सदर घटनेत ५ आरोप असून कलम भादवी ३०२,१४३,१४८,१४९, व अट्रोसिटी ऍक्ट २०१५ चे कलम १८८९ ,३(१)(r)(s)३(२)(va) ३(२) (v),६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)सह१३५ आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
तर काही आरोपी फरार झाले असून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे .?
समाज माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे तसेच फक्त दलितांवर का अत्याचार होतो असे प्रश्न विचारले जात आहेत.

इथे हि वाचा

लोकप्रिय तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरच्या या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

कोकणवासीयांना मदतीला भाजपा 14 ट्रक मदत सामुग्री

यूपीएससी चा विद्यार्थी तरूण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी; आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी :- रामदास आठवले


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.