पॅनिक चे बटन आणी भीतीचा धंदा

सावधानसरकारने पॅनिक-भीतीचे बटन दाबले आहे कोरोना पेक्षा महा-भयंकर असा कोरोनाच्या भीतीचा धंदा सुरु झाला आहे..
एकदम पद्धतशीर पणे मोठे रॅकेट सक्रिय झालेले आहेत. ते एक चक्रव्यूह बनवून सर्व सामन्यांना ओढून, एका क्षणात आयुष्यभराची कमाई संपवत आहेत. त्यात कोणाकोणाचे हात आहेत सांगणे कठीण आहे.हॉस्पिटल माफियांपासून, फ़्रॉड टेस्टिंग लॅब, लॉज, होटल्स ई. अश्या बऱ्याच लोकांची चैन तयार झाली आहे.

शाळा चालू झाल्या तर शाळा माफिया सुद्धा त्यात समावेश होतील.सरकारने अश्या प्रकारणांवर वेळीच कारवाई करावी.
ते नाही झाले तर या साखळी मध्ये ते सुद्धा जबाबदार आहेत हे जनतेचे मत बनायला वेळ नाही लागणार.ही साखळी (चैन) कशी काम करते १)साधारण सर्दी, ताप आल्यावर डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर कोरोना टेस्टिंग साठी पठवतात.२)लॅब वाले कोरोना कोविड-१९ टेस्ट पोसिटीव्ह आली सांगतात, मग घरातल्या सर्वांच्या टेस्टिंग करावयास सांगतात.३) एका टेस्टिंग चे कमीतकमी 4000 रूपये.४)त्या नंतर सरकारी हॉस्पिटल मधे जागा नाही असे सांगणे. ५)खासगी इस्पितळात जा असे तेच सुचवणार, त्यात एका व्यक्तीचे बिल लाखांमधे असते.६)सात आठ दिवसांनी घरतल्यांचे रिपोर्ट पॉजिटिव.७)घरातील व्यक्ति कोविड पॉजिटिव आहे मग तुम्ही डिस्चार्ज घेवून घरी परत कसे जाणार? असे काळजीपोटी ते सांगणार.८)मग चौदा दिवस विलगिकरण (quarantine) साठी सरकारी ठिकाणी जागा नाही .९)मग त्यांच्या चैन मधले लॉज /हॉटेल रेफर करणार. १०)चौदा दिवस त्याचे भाड़े. ११)जेवण पार्सल, कपड़े, सॅनिटायझर, मास्क मग ह्या साठी वेगळा धंदा .असे बरेच काही म्हणजे सर्वसामान्यांना पार भिकेला लावायचा अमानुष धंदा.त्यामुळे आशा ट्रॅप मध्ये पडू नका घाबरू नका.. दक्ष राहा जागरूक रहा. संकलन आणी लेखन दादाराव नांगरे

इथे हि वाचा

अखेर त्या नगरसेवकाची झुंज सुध्दा अपयशी ठरली.

पॅनिक चे बटन आणी भीतीचा धंदा

अखेर त्या शिवसेनेच्या नगरसेवकाचे कोरोनाने निधन.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: