कोरोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल- डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन | असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच कोरोना व्हायरस आपोआप गायब होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं.
कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरीही मला आशा आहे की हा कोरोणा आपोआप नाहीसा होईल , असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
सध्या कोरोणा च्या पार्श्वभूमीवर गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. लवकरच कोरोणा वर लस सुद्धा शोधून काढू. त्यामुळे लवकरच अमेरिका सुस्थितीत असेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोबर काही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लवकरात लवकर कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती अधिकाधिक अत्यंत वाईट होऊ शकते.
इथे हि वाचा
सैफ अली खानच घराणेशाही बाबत वक्तव्य….
महिनाभरात महाराष्ट्रात वाढले एक लाख कोरोना रुग्ण..
रितेश आणि जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय