धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

Spread the love

पुणे | पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवनेरी बसच्या चालकानं हॅार्न वाजवल्याचा राग आल्यामुळं 3 युवकांनी मिळुन चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केलं.

रात्री सव्वा अकराच्या सुमारास बस चालक अमोल गायकवाड शिवनेरी बस घेऊन चालले होते. मालधक्का चौकात आल्यावर अमोलनं बसचा हॅार्न वाजवला. त्याचा राग आल्यामुळं तीन युवकांनी बस अडवून अमोल यांना हॅार्न का वाजवला असं विचारत त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली.

याप्रकरणी अमोल यांनी या तीन आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तीन अरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.

इथे हि वाचा

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

शिवसेना भाजपच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन पोट भरते; आशिष शेलारांची टीका

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना


Spread the love