सातारा दि. 13 ( जि. मा. का ) : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जगाबरोबर देशाला आणि राज्याला झळ सोसावी लागली आहे. तर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे ही परिणाम काही जिल्ह्यांना भोगावे लागले आहेत. तर तेथील जनजींवन विस्कळीत झाले आहे. तर या कोरोनाच्या संसर्गा- मुळे अर्थचक्र थांबले, याचा फटका शेतकऱ्यांपासून ते उद्योगपतींनाही बसला. पहिल्या लॉकडाऊनपासून शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यावर शासनाने भर दिला असून शासन खंबीरपणे पाठीशी आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज केले
कोरोनाच्या संकट काळात पाटण तालुक्यातील 21 हजार 500 कुटुंबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवणे हाच कोरोनापासून बचात करण्याचा उपाय आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असून शेतकऱ्यांसाठी जे करावे लागेल ते शासन करीत आहे, असेही श्री. देसाई यांनी शेवटी सांगितले.यावेळी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक यावेळी शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
इथे हि वाचा
नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या – प्रकाश आंबेडकर
विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काढावा -मा. रामदास आठवले
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावे – प्रकाश आंबेडकर