स्टर्लिंग इंजिनचे संशोधन
स्मृतिदिन – ६ जुन १८७८
रेव्हरेड डॉ रॉबर्ट स्टर्लिंग एक स्कॉटिश होते , आणि स्टर्लिंग इंजिनचे आविष्कारकर्ते होते. त्यांचा सर्वोत्तम ज्ञात शोध हा हिट इंजिन आहे, जो आता स्टर्लिंग इंजिन म्हणून ओळखला जातो.१८१६ मध्ये रॉबर्ट स्टर्लिंग आणि त्याचा धाकटा भाऊ जेम्स स्टर्लिंगने स्कॉटलँड व इंग्लंड या दोन्ही ठिकाणी हिट इंजिनच्या पेटंटसाठी अर्ज केले. या शोधाचे कार्य म्हणजे एका ठराविक यंत्रणेद्वारे हवेच्या माध्यमातुन
उष्णता साठवून ठेवणे आणि ती रिलीज करणे हे होते. हे इंजिन त्याकळी सर्रासपणे वापरले जाणार्या वाफेच्या इंजिनपेक्षा वेगळे होते.या संशोधनामध्ये राॅबर्ट यांना बर्याच अडचणी आल्या. त्यांनी आवश्यक ते बदल करुन पुन्हा एक सुधारित पेटंट सादर केला. आणि त्यात ते यशस्वी झाले.आजकाल स्टर्लिंग इंजिनचा उपयोग क्वचितच होत असला तरी, लॉस अलामोस नॅशनल लेबोरेटरी आणि नासा यांसारख्या रिसर्च संस्थांच्या व्यवसायात या इंजिनबद्दल रस असल्याचे दिसते
इथे हि वाचा
पैसा सर्वस्व नाही…
आसादा कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या तर्फे ऑनलाइन शुभारंभ.
कोणत्या कारणामुळे पाण्यात निर्माण झालेले सजीव जमिनीवर येऊ शकले..?