काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

जयपूर | राजस्थानमध्ये काही दिवसांपासून बरीच राजकीय उलाढाल झालेली दिसून येत आहे. काही काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आधी दहा कोटी रुपये असलेली किंमत आता पंधरा कोटी रुपये झाल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कडून करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी चार्टर विमानातून जैसलमर मध्ये कॉंग्रेस आमदारांना आणण्यात आल. 14 ऑगस्टपर्यंत काँग्रेसचे सर्व आमदार हे तेथेच राहणार असल्याची माहिती मिळाली. 14 ऑगस्ट नंतर राजस्थान मधील राज्यपालांनी विधानसभेचे कामकाज सुरू करण्याची संमती देण्यात आलेली आहे. याच सर्व बंडखोर आमदारांनी पुन्हा पक्षात परत यावे असे आवाहन गेहलोत केले आहे.

राजस्थानच्या या राजकारणावर बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी सरकारच्या विरोधात व्हीप काढली आहे. यावर गेहलोत यांच्या कडून टीका करण्यात आली आहे. या निर्णयामागे भाजप सरकार असून या दोघांनाही काँग्रेस सरकार पाडायचे असल्याचं गेहलोत म्हणाले.

मायावती सरकार विरोधात जी काही विधाने करत असताना दिसून येत आहे यामागे भाजप सरकार असल्याचे ते म्हणाले. भाजप विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ईडी आणि सीबीआय यांचा वापर करत आहे,या गोष्टीचा दबाव मायावती यांच्यावर असल्यामुळे या भाजपच्या बाजूने आहेत असं गेहलोत म्हणाले.

इथे ही वाचा

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

“देशात सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आलं ते उगीच आलं का?”

“देशात सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आलं ते उगीच आलं का?”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: