इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनची औषध कंपनी अॅस्ट्राझेनेका ही ऑक्स्फोर्ड विद्यापिठासोबत मिळून करोना व्हायरसवर लस विकसित करत आहे. कंपनीने म्हटले की, सप्टेंबरपर्यंत दोन अब्ज लसी बाजारात आणण्याच्या तयारी कंपनी आहे. अमेरिकेने म्हटले की, सुरक्षा चाचणीसाठी लसीचे २० लाख डोस तयार आहेत.
अॅस्ट्राझेनेका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकार पास्कल सोरियट यांनी बीबीसी रेडिओला सांगितले की, आम्ही योग्य मार्गावर आहोत. त्यामुळे आम्ही आताच लसीची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. निष्कर्ष येण्याआधीच आमच्याकडे लसी तयार आहेत. ऑगस्टपर्यंत सर्व माहिती आमच्याकडे असेल आणि सप्टेंबरमध्ये आपल्याला कळेल की आपल्याकडील लस ही परिणामकारक आहे की नाही, असेही सोरियट यांनी स्पष्ट केले.
लसीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोइलिएशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेसल इनोव्हेशन्स, गाव्ही आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. या सर्वांच्या माध्यमातून नव्या लसीचे २ कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत, असे वृत्त एएफपीने या वृत्तसंस्थेने दिले आहे.
इथे हि वाचा
उद्यपासून मुंबई मधील बेस्ट बस सेवा जनतेसाठी धावणार
५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु
अरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा !