नवी दिल्ली | महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे सरकारचे समर्थन काढल्यास अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्वातील ठाकरे सरकरला भाजपने पाठिंबा द्यावा आणि राज्यात स्थिर सरकार द्यावं, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं समर्थन माघारी घेतलं. त्यावेळी राज्या राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करून भाजपने शिवसेनेला पाठिंबा द्यावा. शिवेसेनाला पाठिंबा देऊन एनडीएचं स्थिर सरकार स्थापन करावं, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.
काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही, असा सर्वच मंत्र्यांचा आक्षेपाचा मुद्दा होता. काँग्रेसची काही ध्येय-धोरणे आहेत, विचारधारा आहे, त्याला सरकारमध्ये काही स्थान आहे का, असा प्रश्न काही मंत्र्यांनी उपस्थित केला होता.
इथे हि वाचा
उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या
…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट