…तर अजितदादांसोबतचं सरकार टिकलं असतं; फडणवीसांनी सांगितला त्या दिवसांतला घटनाक्रम

Spread the love

मुंबई | अख्ख्या महाराष्ट्राने सरकार स्थापन होण्यासाठी निवडणुकीनंतर झालेला सत्तासंघर्ष बघितला.देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांच्याबरोबर आपल्या सरकार बनवलं होतं .परंतु हे सरकार दोन दिवसातच पडलं नेमका कोणत्या गोष्टींमुळे हे सरकार पडलं या मधला घटनाक्रम काय होता याबाबतची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी दिली व या घटनाक्रमाचा पूर्ण खुलासा केला.

देवेंद्र फडवणीस यांची द इनसाईडर सोबत झालेला मुलाखती मध्ये ते म्हणाले जेव्हा आमच्या सोबत शिवसेना येत नसल्याचं समजलं तेव्हा आमच्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे थेट राष्ट्रवादीची आलेली ऑफर., याबाबत योग्य ती चर्चा सुद्धा करण्यात आली होती या चर्चेनंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आता ते सरकार येणार नाही म्हणून आपली भूमिका बदलली नाही.आणि आता आपल्या हातात हे सरकार येणार नाही म्हणून तीन-चार दिवसात यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यात आले नाही.

त्यानंतर तीन-चार दिवसांनी अजित पवार यांच्यासोबत आमची चर्चा झाली व त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितले की माझ्या मते हे तीन पक्ष चा सरकार चालू शकणार नाही. आपल्या राज्याला स्थिर सरकार भाजप राष्ट्रवादी देऊ शकेल यामुळेच आम्ही तुमच्या सोबत सरकार बनवण्यास तयार आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

त्याच बरोबर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की, अजित पवार यांच्याकडे पुढे संख्याबळ असल्याने सकाळी शपथविधी करण्याचा निर्णय झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्याकडे न लागता आमच्याविरोधात लागला म्हणून हे सरकार कोलमडलं .परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर विरोधात लागला नसता तर हे सरकार 100% टिकलं असतं .

इथे हि वाचा

देवेंद्र फडवणीस-वाईट तर याचं वाटलं की एवढ्या जागा जिंकूनही मुख्यमंत्री झालो नाही.

चांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.